मुक्त संचार गोठा
मुक्त संचार गोठा मुक्त संचार पद्धतीत एका गाईला 100 ते 150 चौ. फूट याप्रमाणे जागा उपलब्ध करून देणे, याशिवाय सावली आणि ऊन, पिण्याचे पाणी, चारा आणि तेथेच दूध काढण्याची सोय उपलब्ध केल्यामुळे त्यांना पाहिजे त्या वेळी त्यांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार चारा खातात, पाणी पितात, हवामानातील बदलानुसार ऊन- सावली घेतात, स्वच्छ जागेत जाऊन बसतात, त्यामुळे त्यांच्या शरीराला शेण लागत नाही, स्वच्छंदाने त्या फिरतात. त्यांच्या इच्छेनुसार निवांत बसून चांगले रवंथ करतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते. त्यांना फिरता येत असल्यामुळे नखे वाढत नाहीत, गोचीड होत नाहीत, आजाराचे प्रमाण कमी होते. मोकळ्या सोडलेल्या गाईंच्या अंगावर एक वेगळी चकाकी येते. त्यांनी दिलेल्या दुधातील जैविक घटकांमध्ये निश्चितच बदल होत असतील. मुक्त संचार पद्धतीने गोठा तयार करावयाचा म्हणजे फार मोठा खर्च येईल या शंकेने काही शेतकरी याकडे वळत नाहीत. शेतकऱ्यांकडे उपलब्ध भांडवलामध्ये अत्यंत कमी खर्चापासून ते जास्त खर्चाच्या आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करता येतो. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या गाई बांधण्यासाठी शेड आहे, त्यालाच जोडून बांबू, लाकडी गोल्ट...