मुक्त संचार गोठा
मुक्त संचार गोठा
मुक्त संचार पद्धतीत एका गाईला 100 ते 150 चौ. फूट याप्रमाणे जागा उपलब्ध करून देणे, याशिवाय सावली आणि ऊन, पिण्याचे पाणी, चारा आणि तेथेच दूध काढण्याची सोय उपलब्ध केल्यामुळे त्यांना पाहिजे त्या वेळी त्यांच्या आवडीनुसार आणि वेळेनुसार चारा खातात, पाणी पितात, हवामानातील बदलानुसार ऊन- सावली घेतात, स्वच्छ जागेत जाऊन बसतात, त्यामुळे त्यांच्या शरीराला शेण लागत नाही, स्वच्छंदाने त्या फिरतात. त्यांच्या इच्छेनुसार निवांत बसून चांगले रवंथ करतात. त्यामुळे दुधाचे उत्पादन वाढते. त्यांना फिरता येत असल्यामुळे नखे वाढत नाहीत, गोचीड होत नाहीत, आजाराचे प्रमाण कमी होते. मोकळ्या सोडलेल्या गाईंच्या अंगावर एक वेगळी चकाकी येते. त्यांनी दिलेल्या दुधातील जैविक घटकांमध्ये निश्चितच बदल होत असतील.
मुक्त संचार पद्धतीने गोठा तयार करावयाचा म्हणजे फार मोठा खर्च येईल या शंकेने काही शेतकरी याकडे वळत नाहीत. शेतकऱ्यांकडे उपलब्ध भांडवलामध्ये अत्यंत कमी खर्चापासून ते जास्त खर्चाच्या आधुनिक पद्धतीचा गोठा तयार करता येतो. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या गाई बांधण्यासाठी शेड आहे, त्यालाच जोडून बांबू, लाकडी गोल्टे, चेनलिंक, सिमेंट पाइप, लोखंडी पाइप यासारखे साहित्य वापरून मोकळे फिरण्यासाठी जागा उपलब्ध करता येईल. या मोकळ्या जागेतही काही भागामध्ये शेडनेट टाकली, तर काही प्रमाणात सावली अन् काही प्रमाणात ऊन मिळते. गाई ज्या जागेत फिरतात तेथे उभ्या उसाचे पाचट किंवा बारीक केलेला काडीकचरा टाकला तर त्याचा उपयोग गाईंना बसण्यासाठी बेडिंग मटेरिअल म्हणून होतो. दहा गाईंना अंदाजे दोन गुंठे क्षेत्राच्या आकाराची मोकळी जागा करावी. चारा खाण्यासाठी एका बाजूला विशेषतः शेडमध्ये गव्हाण करावी. गव्हाण शेडच्या उत्तरेकडे असल्यास चांगले. गव्हाणीत चारा बाहेरून टाकता येईल, अशी सोय करावी. यामुळे चारा वाहतूक करणे सोपे जाईल. चारा डेपो, कडबाकुट्टी यंत्र आणि चाऱ्याची गव्हाण यांतील अंतर कमी ठेवावे, त्यामुळे कष्ट वाचतील. पाण्याची सोय शेडच्या दुसऱ्या बाजूला करावी, जेणेकरून टाकी धुतल्यानंतर पाणी बाहेर काढून देणे सोपे होईल. गाईंना खाजविण्यासाठी मुक्त गोठ्याच्या मधोमध सोय करावी. एक खांब जमिनीत गाडून त्या खांबाला जाड काथ्या गुंडाळाव्यात. याचा वापर जनावरे अंग खाजविण्यासाठी करतात.
मुक्त संचार गोठा करताना तीन भाग करावेत. एका लहान भागामध्ये वासरांची सोय करावी. वासरांच्या शेडच्या बाजूला भिंतीची उंची जास्त असावी, जेणेकरून त्यांचे बदलत्या वातावरणात संरक्षण होईल. दूध देणाऱ्या गाई आणि गाभण गाई वेगवेगळ्या ठेवाव्यात. त्यानुसार त्यांना आहार देता येतो, तसेच त्यांचे योग्य व्यवस्थापनही करता येते. दूध काढण्यासाठी गोठ्याच्या एका बाजूला सोय करावी. या शेडजवळच खाद्य ठेवण्याची, तसेच भिजवून ठेवण्याची सोय असल्यास गाईच्या दूध उत्पादनाप्रमाणे त्यांना वेगवेगळे खाद्य खाऊ घालता येते. तेथेच गाईंना लागणारी विविध औषधे, जैविके, प्रतिजैविके, खनिजे ठेवण्याची सोय करावी. त्याच्याजवळच कार्यालय केले तर तेथे कॉम्प्युटर व इतर सर्व व्यवस्था करता येते. भविष्यात किती प्रमाणात हा व्यवसाय वाढवायचा किंवा या व्यवसायाचे स्वरूप काय ठेवायचे, यानुसार सर्व व्यवस्था करणे गरजेचे आहे. मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय असेल तर वेगळे मिल्किंग पार्लर करणे फायद्याचे ठरेल. प्रत्येक गाईचे रेकॉर्ड कॉम्प्युटरवर ठेवून दूध उत्पादनानुसार खुराक देणे, तसेच इतर व्यवस्थापन ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे गरजेचे आहे.
मुक्त संचार पद्धतीमध्ये शेण उचलण्याचे काम दररोज करावे लागत नाही; परंतु गरजेनुसार महिन्यातून एकदा- दोनदा सर्व काडीकचरा, शेण उचलून बाहेर टाकून सर्व गोठा स्वच्छ करणे चांगले. तसेच, अशा वेळी गाईंनाही स्वच्छ धुता येईल. शेण- गोमूत्र, काडीकचरा चांगला एकत्र होऊन बऱ्याच अंशी कुजलेला असल्यामुळे असे खत शेतात लगेच टाकता येते. अशा खतापासून गांडूळ खतही चांगले तयार होते. मुक्त गोठा तयार करण्यासाठी दहा गाईंकरिता 30 ते 40 हजार रुपयांपासून दोन ते तीन लाखांपर्यंत खर्च येतो. अर्थात, क्षमतेनुसार खर्च करावा किंवा थोडा थोडा खर्च करून आधुनिकीकरण करावे. प्रत्येक गोठ्याला पाणी, रस्ता किंवा तात्पुरती शेडनेटची शेड असावी. शेडच्या कडेला मोठी झाडे लावावीत, यामुळे उष्ण वारे, थंड वारे, वावटळ यांपासून जनावरांचे संरक्षण होईल. झाडी नसेल तर उन्हाळ्यामध्ये गरजेनुसार बाजूला शेडनेट किंवा गोण्याचा कागद सोडावा. यामुळे गाईंवर वातावरणातील बदलत्या हवामानाचा परिणाम होणार नाही. शेडमध्ये गावठी कोंबड्या पाळाव्यात. शेणातील किडे खाण्यासाठी कोंबड्या शेण पसरवितात, त्यामुळे शेण चांगले मिसळून लवकर वाळते, तसेच कोंबड्या गोचीड वेचतात, त्यामुळे गोचिडांचेही नियंत्रण होते. कोंबड्या आणि अंड्यांचे उत्पादन मिळते ते वेगळेच. भविष्यात गॅस आणि विजेचे वाढलेले दर यांचा विचार करून गोबर गॅस प्रकल्प गोठ्याच्या जवळच केला तर तयार झालेल्या गॅसपासून विद्युत तयार करून त्याचा वापर जनरेटरसाठी तसेच घरामध्येही करता येईल. तसेच, गॅस स्वयंपाकासाठी वापरून गॅसची बचत करता येईल. मुक्त संचार पद्धतीचा अवलंब करताना या सर्व बाबींचा विचार करून एक मास्टर प्लॅन तयार करावा. उपलब्ध निधीनुसार सर्व सुविधा उभारण्याचे नियोजन करावे, जेणेकरून सर्व खर्च एकावेळी करावा लागणार नाही. या सर्व बाबींचा विचार करून एकात्मिक पद्धतीने मुक्त संचार पद्धतीने गोसंवर्धन प्रकल्पाचा अवलंब करावा.
पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष
भारतीय दूध
उत्पादक शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत आला आहे.
पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम
मर्यादित राहिली.
उदाहरणार्थ,
एका शेतकऱ्या कडे
आज एक गाय आहे आणि ती दरवर्षी किंवा २ वर्षाआड वेत्ये, तर ४-५ वर्षांनी
गाय व तिची पुढची पिढी मिळून ४-५ जनावरे त्याच शेतकऱ्या कडे असली पाहिजेत. ते ना होता, त्या शेतकऱ्या
कडे ३-४ वर्षांनी सुद्धा १ किंवा २ च गाई दिसतात.
त्याच बरोबर प्रति गाय व
म्हैस या दुभत्या जनावरांची दूध उत्पादन करण्याची सरासरी ही फारच कमी आहे.
९०
टक्क्यांपेक्षाही जास्त दूध उत्पादका कडे २ ते ३ याच प्रमाणात गाई आहेत. गाईंची
संख्या व वंशावळी ची गुणवत्ता वाढल्याशिवाय दूध उत्पादक शेतकरी फायद्यात येणे शक्य
नाही.
दुग्धव्यवसायातील अपयशाची
कारणे
दुभत्या गाई व
म्हशींची प्रति दूध उत्पादक शेतकरी संख्या मर्यादित राहण्याची प्रमुख दोन कारणे
पुढील प्रमाणे आहेत.
1.
पारंपरिक पद्धतीने दुग्ध
व्यवसाय करताना दिवसभर अति कष्ट करावे लागणे.
दूध उत्पादक
शेतकरी वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीमध्ये दिवसातून २ ते ३ वेळा शेण उचलतो.
2.
संपूर्ण वर्षभर लागणाऱ्या
पौष्टिक चाऱ्याचे नियोजन नसणे.
दूध धंद्यामध्ये हमखास बक्कळ
उत्पन्नासाठी काय कराल
दिवसभरातील अति
कष्ट वाचावेत यासाठी मुक्तसंचार
गोठा व वर्षभराच्या पौष्टिक
चाऱ्याचे नियोजन व्हावे म्हणून मुरघास निर्मिती केली पाहिजे.
दुभत्या गाईचे
संगोपन करताना त्यांच्या साठी मुक्तसंचार गोठा पद्धतीचा अवलंब करावा. यामध्ये
शेतकऱ्यांचे कष्टही कमी होतात व गाईचे स्वास्थ्य देखील चांगले राहते. परिणामतः दूध
उत्पादनात वाढ होते.
या ब्लॉग पोस्ट
मध्ये आपण मुक्तसंचार गोठा पद्धतीची माहिती घेऊया.
मुक्तसंचार गोठा पद्धत म्हणजे काय
1.
मुक्तसंचार गोठ्या मध्ये
गाईंना बांधले जात नाही.
2.
गाईंना एका मोठ्या कंपाऊंड
मध्ये शेड बांधून मोकळे सोडले जाते.
3.
त्यांच्या चाऱ्याची व पाणी
पिण्याची व्यवस्था तिथेच गव्हाणा मध्ये करण्यात येते.
4.
शेण वारंवार काढले जात नाही.
5.
गाई एकेमकाना मारत नाहीत.
आता तुम्ही
म्हणाल हे कसे शक्य आहे. वरील सर्व गोष्टी खालील माहिती द्वारे स्पष्ट होतील.
एका गाईला किंवा म्हैशीला मुक्त संचार
पद्धतीच्या गोठ्यात मोकळे सोडण्या साठी कमीत कमी २०० चौ. मी. जागा लागते. एक गुंठा
जमीन क्षेत्रात आपण पाच मोठी जनावरे मोकळी सोडू शकतो. गाईला मुक्त सोडण्या पूर्वी तार जाळीचे
किंवा भिंतीचे अर्ध्या जाळीयुक्त कंपाउंड करून आत मध्ये गव्हाण व पाण्याच्या
हौदाची व्यवस्था करणे आवश्यक असते. गाईला
मोकळे सोडल्यावर एक ते दोन दिवस मुक्त पद्धतीची सवय लागण्यात जातात. या कालावधीत शेतकऱ्याने
सतर्कता बाळगायला हवी. गाई मोकळ्या सोडल्यावर त्या एकमेकींना मारतील या भीतीने शेतकरी मुक्त
गोठा पद्धत अवलंब करण्यापासून माघार घेतात. परंतु पहिले दोन दिवस सवय
लागल्यावर गाई एकमेकांना मारत नाहीत. जर एखादी गाय इतर गाईंना
मारत असेल तर तिला पायकूट घालून आपण प्रतिबंध करू शकतो. गाईच्या तोंडाच्या
म्होरकीला एक बाज व कोणत्याही एका पायाच्या गुडघ्याच्या थोडेसे वर
असे दोरीच्या साहाय्याने आखडून बांधणे म्हणजेच पायकूट
घालणे
होय. अशा प्रकारे आपण जनावरांच्या हालचालीवर प्रतिबंध घालू
शकतो.
Good
ReplyDeleteफारच उपयोगी माहिती मिळाली,
ReplyDeleteधन्यवाद।
Very nice information for farmers. It should be a regular practice.
ReplyDeleteखुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
ReplyDeleteMahiti changli dili
ReplyDeleteमुक्त संचार गोठाच्या
ReplyDeleteनिष्कर्ष काय आहे
Kup chan mahiti aahe
ReplyDeleteChan mahiti ahe.
ReplyDeleteसर मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे मी लहान पानापासून मुंबई मध्ये रहात आहे कोरोना मुळे मी गावी आलो होतो आणि आता गावी माझी 8 एकर शेती आहे मी मुक्त गोठा व गाई घेऊन गावी बिझनेस करायचा विचार करतोय मी सध्या ह्या साठी 10 लाख रुपयांची तरतूद करु शकतो पण मी नवीन आहे म्हणून आपले मार्गदर्शन मिळावे माझ्या आयुष्यात मी मुंबई मध्ये वहान चालक म्हणून नोकरी करीत होतो तरी मी ह्या धणदयात घाटयात नाही ऐनार ना तुमचे म्हणणे कळवा नमस्कार
ReplyDeleteCasino and Hotel, Wynn - MapyRO
ReplyDeleteCasino and 이천 출장안마 Hotel, Wynn - The 천안 출장안마 most recent 안성 출장안마 addition to the Resorts collection of hotels, resorts, 김포 출장샵 restaurants, 포천 출장마사지 shops and entertainment.